नेताजी सुभाष चन्द्र बोस महान देशभक्त, क्रांतिकारी व स्वतंत्रता सेनानी – प्राचार्य डॉ नाथा मोकाटे

नेताजी सुभाष चन्द्र बोस महान देशभक्त, क्रांतिकारी व स्वतंत्रता सेनानी – प्राचार्य डॉ नाथा मोकाटे
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 128 जयंती साजरी.

संपादक अग्रदूत /आळंदी -23 जानेवारी -येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत शरद चंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयातील सांस्कृतीक विभाग व विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने नेताजी सुभाष चन्द्र बोस यांची 128 जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नाथा मोकाटे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या क्रांतिकारक, देशभक्ती व स्वातंत्र्य चळवळीतील दिलेल्या मौल्यवान कार्याचा उलगडा केला.
यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.डॉ. पांडुरंग मिसाळ अधीक्षक प्रवीण भावे,इंग्रजी व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. रोहित कांबळे, बिसिए विभाग प्रमुख प्रा. प्रफुल्ल जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब, प्रा.डॉ. देवानंद गोरडवार. प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. प्रतिभा गुंड, प्रा.कविता पिलावरे, प्रा. यशोदा अनेराव,प्रा. पूजा खेडकर,ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. वाळुंज,मुख्याध्यापक पानसरे, वर्षा ताजने, व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. देवानंद गोरडवार यांनी केले तर आभार प्रा. माणिक कसाब यांनी मानले.